Kharip 2023 खान्देशात कोळपणीला वेग

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात पाऊस झाल्याने पूर्व हंगामी कापसाच्या शेतीत शेतकऱ्याची कोळपणी सुरु;

Update: 2023-07-05 04:30 GMT

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर्व हंगामी कापूस लागवड ( Cotton Cultivation) केली जाते. परंतु गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने पूर्व हंगामी कापूस ठिबक सिंचनाच्या ( drip irrigation)साह्याने शेतकरी जगवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु एक आणि दोन जुलै रोजी चोपडा तालुक्यात काही प्रमाणात पाऊस झाल्याने पूर्व हंगामी कापसाला संजीवनी मिळाल्याने शेतातील पूर्व हंगाम कापूस ढोलू लागला आहे. त्याची वाढ देखील होत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग शेतात कोळपणी करताना दिसत आहेत. अजून पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे

Full View

Tags:    

Similar News