मी सरकारमध्ये जरी असलो तरी आंदोलन करायला तयार : आ. बच्चु कडू
शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेतकरी बी येत नाही... बच्चु कडू;
मुख्यमंत्र्यांचा ही बंगला बांधून देणार एवढी ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे .फक्त शेतीमालाला भाव पाहिजे. पण भाव नाही मी सरकारमध्ये जरी असलो तरी आंदोलन करायला तयार आहे पण तुम्ही आंदोलनात येत नाही. वेगवेगळे कारण सांगितले जाते तर शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेतकरी बी येत नाही असं विधान आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील वाठोडा येथे एका कार्यक्रमात केलं. एकेकाळी शेतकऱ्यांसाठी रान उठवणारे बच्चू कडू आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार का? हा सवाल उपस्थित झाला आहे.