शेतकऱ्यांच्या वाढणार चिंता, हवामान खात्याने दिला अवकाळी पावसाचा इशारा

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये ४ ते ६ मार्च दरम्यान अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.;

Update: 2023-03-04 10:33 GMT

महाराष्ट्रातील वातावरणात गेल्या महिन्यांपासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्यात कडक उन्हाच्या झळा बसत होत्या तर मार्च महिन्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Department of Meteorology) वर्तवली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यातच तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकांनी बसणार आहे. IMD unseasonal Rain Alert to Farmer in महाराष्ट्र IMD unseasonal Rain Alert to Farmer in Maharashtraपूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती तसेच अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ४ ते ८ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून, अवकाळी पावसाची (Unseasonal Rains) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस व बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण मध्य प्रदेश व गुजरात आणि उत्तर कोकण या भागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या (Department of Meteorology) अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये हलक्या सरींसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रविवार आणि सोमवार मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथे पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भात सर्वत्र पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. ५ मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात वीजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात ४ ते ६ मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rains) पिकांना फटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. द्राक्ष (Grapes) काढणीला आल्याने त्यातच पाऊस पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांना वाटत आहे.  

Tags:    

Similar News