1 rs Pik Vima | विमा अर्जासाठी अवैध वसुली: ह्या नंबर वर थेट तक्रार करा...

Update: 2024-07-03 10:19 GMT

अवघ्या एक रुपयात पीकविमा हप्ता अशी राज्य सरकारची घोषणा असतानाही काही 'सीएससी' केंद्रचालक फॉर्म भरण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून 200 ते 300 रुपये पैसे उकळत असल्याचा प्रकार उघडकीस आला. राज्याच्या अधिवेशनातही विरोधी आमदारांनी सरकारला धारेवर धरलं. यानंतर सरकार ऍक्शन मोड वर आली.

1 रुपया पेक्षा जास्त शुल्क आकारण्याविरुद्ध कारवाई -

सरकारने पीक विमा भारताना 1 रुपया पेक्षा जास्त शुल्क मागणी करणाऱ्या केंद्रा विरुद्ध तक्रार केल्यास कारवाई करणाचा ईशारा सरकारने दिला. हा गैरप्रकार रोखण्यासाठी स्थानिक कृषी विभागाचे कर्मचारी जाऊन या बाबत तपासणी करत आहेत. तर ही अवैध वसुली रोखण्यासाठी सीएससी केंद्रांना तंबी दिली आहे. तसेच चौकशी दरम्यान काही लोक गैरप्रकार करत असल्याचे उघड झाले असून त्यांच्या निलंबनाबाबत कारवाई प्रस्तावित आहे.

महसूल विभागाचे 'सीएससी' केंद्रांवर नियमन आहे; मात्र पीकविमा ही बाब कृषी विभागाशी संबंधित असल्याने कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय नाही याचा फायदा सीएससी' केंद्रांचालक घेत असून शेतकऱ्यांची लूट केली जातेय.

ह्या नंबर वर करा तक्रार -

शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून सरकारने तातडीने टोल फ्री क्रमांक तसंच व्हाटसअप वर तक्रार केल्यास कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे.खालील क्रमांकावर आपली तक्रार करू शकता...

पीक विमा अर्ज भरताना ₹ १ पेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्यास येथे थेट तक्रार नोंदवा.👇

टोल फ्री : १४४११ / १८००१८००४१७

तक्रार नोंद : ०२२-४१४५८१९३३ / ०२२-४१४५८१९३४

व्हाट्सअ‍ॅप : ९०८२९२१९४८

ईमेल : support@csc.gov.in

Tags:    

Similar News