Shahu Maharaj शाहू राजा नसते... तर ?

शाहू राजा नसते... तर ?मराठा बटालिअन, राधानगरी धरण, पश्चिम महाराष्ट्राची सुबत्ता, सहकाराची श्रीमंती, पुरोगामित्वाची परंपरा, मूकनायक, बाबासाहेबांचं उच्चशिक्षण आणि एक प्रकारे आधुनिक भारताच्या सशक्त समाजाचा पाया .. यांपैकी काहीच उभं राहीलं नसतं.

Update: 2023-06-26 13:15 GMT

समाज सुधारणा आणि कृषी सुधारण्याची बीजं रोवणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती जयंतीच्या निमित्ताने समजून घ्या छत्रपती शाहू महाराज नसते तर मॅक्स किसानचं स्पेशल पॉडकास्ट....

Full View

दूर्दैवाने मराठा अस्मितेचा वापर आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जपणाऱ्या काही अपवाद ठरलेल्या मराठ्यांनी, मराठा संघटनांनी, शासकांनी शाहूराजांना कायम परकं लेखलं आहे. त्यांचा वापर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र एवढं बोलण्यापुरता केला आहे.

मराठा अस्मितेच्या प्रसंगी शिवाजी कमी, भवानीदेवीच्या नावाचा गरज अधिक केला आहे. ज्या लढवय्या वृत्तीची साक्ष मराठा समुहाकडून दिली जाते त्याचे खरे अधिष्ठान शाहू राजांनीच मिळवून दिले आहे. याचा स्विकार सुद्धा केला जात नाही. हे स्विकार न करणारे लोक उदयनराजेंना आपला राजा मानतात. वंशवादाचा फायदा आहे तो.

शाहूराजा स्विकारणं, कळणं आणि पचनं कुणासाठीही अवघडच आहे.

शाहूराजे नसते तर आज या देशातून अस्पृश्यतेची बीजं नष्ट झालेली पहायला मिळाली नसती.

शाहूंना क्षणभरासाठी देखील विसरणं कोल्हापूरला किती महागात पडलंय ते फक्त कोल्हापूरकरच नीट जाणून कदाचित जागे झालेत. १०० वर्षांपासून एकही दंगल न पाहीलेली भूमी शाहूराजाला क्षणभर विसरली अन् कलंकित होऊन बसली.

शाहूराजा नेणिवेत, जाणिवेत आहे तरच समतेचं राज्य आहे.

© Vaibhav Chhaya

Happy Birthday My beloved King...


Tags:    

Similar News