पुढच्या ३ महिन्यात टोमॅटोच्या दरांचे गणित कसे राहणार?
भारतात पेट्रोलचे दरही ऐतिहासिक उंची गाठत असताना सोशल मिडीयामधे टोमॅटोचे दर वाढल्यानं लोक सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाली होती. कांद्या इतकेच संवेदनशील असलेलं टॉमेटाच्या मार्केटमधे कसे चढउतार झाले? लागवड, मागणी आणि अनुभवाच्या आधारे प्रगतीशील शेतकरी शिवाजी आवटे यांनी Max maharashtra साठी केलेलं अभ्यासपूर्ण विश्लेषण शेतीकरी वर्गासाठी निश्चितपणे उपयोगी ठरेल....;
टोमॅटो ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 टोमॅटो बाजार भाव कसे रहाण्याची शक्यता आहे या बाबतीत माहीती घेताना 2020 ला जानेवारी ते जुन आणि 2021 ला जानेवारी ते सप्टेंबर (अपवाद जुलै) या कालावधीत मंदी पहायला मिळाली हे लक्षात ठेवले पाहीजे. पुढे दोन्ही वर्षी आक्टोबर नोव्हेंबर महिन्यात चांगल्यापैकी तेजी पहायला मिळाली होती. 2022 ला 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल पुन्हा भाव पडलेले दिसले आणि पुढे तेजी येणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.
आक्टोबर 2021 ते 15 फेब्रुवारी 2022 इथे सातत्याने चांगले भाव टिकून होते तरीही पुढे मे जून तेजी येणार हे स्पष्ट होते. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 मार्केट ची दिशा कशी असेल याबाबत विचार करता 1 मे 2022 ला जेव्हा टोमॅटो 50+ किलो चे ठोक भाव झाले आणि टोमॅटो लागवडी साठी शेतकऱ्यांची धांदल उडाली.जिथून रोपं जशी उपलब्ध होतील तशा लागवड करत राहिले 2021 जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांचा विचार करता फक्त जुलै महिन्यात थोडे भाव वाढले होते आणि 2022 ला इथं थोडी आवकं वाढण्याची शक्यता होती ती मे च्या तेजी ने त्यावर शिक्कामोर्तब केले.जसे 28 एप्रिल ला भाव वाढले तसे त्याच पद्धतीने 28 जुनला एकाएकी कोसळले.
मे महीना तेजीचा होता तिथे लागवडी मोठ्या प्रमाणात झाल्या मात्र जुन महिन्यात तेजी असुनही त्यातुलनेत टोमॅटो लागवड झाली नाही.आणि जुलै महिन्यात पण सततच्या पावसामुळे लागवडीचे प्रमाण तुलनेने घटलेलेच पहायला मिळते. मात्र मागील दोन महिन्यांच्या लागवडीची कसर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भरुन निघण्याची शक्यता आहे.
मे 2022 च्या लागवडीचा भर साधारण जुलै महिन्यात चालू रहाण्याची शक्यता आहे मात्र ऑगस्ट पासून पुन्हा टोमॅटो चा पुरवठा घटण्याची शक्यता आहे. पण मे जुन महिन्यात जो 40+ ठोक भाव पहायला मिळाला तो आता 2022 संपेपर्यंत तरी पहायला मिळण्याची शक्यता कमीच आहे.एकदा मोठी तेजी येऊन गेली की पुन्हा त्या उंचीपर्यंत मार्केट पोहचण्यासाठी नुकसानची पातळी पण तेवढी मोठी गाठायला लागते.
ऑगस्ट महिन्यात 20+ चे भाव पुन्हा पहायला मिळू शकतात सप्टेंबरमध्ये 25 ते 30+ जाण्याची शक्यता आहे. मात्र आक्टोबर 2019/21 मागच्या तीनही वर्षी तेजीत गेल्यामुळे 2022 ला आक्टोबर पासून पुरवठा वाढण्याची शक्यता दिसते तो पुढे वाढतच जाऊ शकतो. अलिकडच्या काळात सप्टेंबर आक्टोबर महिन्यात पाऊस जास्त होतो आणि नुकसान होते भाव वाढतात हे गणित सर्व शेतकरी जाणून आहेत.पण मोठा पाऊस झाला तर सर्व प्रथम माझे नुकसान होणार आहे हे ठरवून लागवड केली तर योग्य होईल. 2022 चा विचार करता आक्टोबर ते डिसेंबर महिन्यात कुठून ना कुठून टोमॅटो ची आवकं वाढण्याची शक्यता जास्त आहे.
-शिवाजी आवटे, 24/7/2022