सर्वसाधारण एका भारतीय
माणसाला दरडोई किती साखर लागते?एका कुटुंबाची एका महिन्याची साखरेची गरज फक्त सात किलो.महिन्याला तीनशे रुपयांच्या साखरेने कुटुंबाचे बजेट कोलमडत नाही.
साखरेच्या दराला अवाजवी महत्त्व असून 65 टक्के गरज ही मिठाई चॉकलेट आणि बिस्कीट उद्योगाची आहे. गरज नसताना विनाकारण साखरेच्या दरावरून गहजब केला जातो असे स्पष्ट मत NFSCSF Ltd. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांची MaxKisan शी विशेष बातचीत करताना व्यक्त केलं.