सरकारी धोरणं कशी ठरतात?

सरकारी धोरणामुळे शेती आणि शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. खरंतर ही धोरण कोणाला समोर धरून ठरवले जातात हेच विचारण्याचं धारिष्ट आता शेतकऱ्यांनी सरकारला दाखवले पाहिजे अशी मांडणी कृषी विश्लेषक आणि प्रगतिशील शेतकरी शिवाजी आवटे यांनी केली आहे.

Update: 2023-08-04 06:26 GMT

शिवाजी आवटे म्हणाले,

सरकारने 120 रुपये किलो टोमॅटो खरेदी करून ग्राहकांना 80 रुपये किलो दराने विक्री केली.तब्बल 40 रुपये किलो मागे खाणारांना अनुदान दिले आणि शेतकऱ्यांना कांदा अनुदान 3.50 रुपये किलो तेही भरमसाठ अटी आणि शर्ती ठेवून घोषणा केली आहे.आता गहू आणि तूर अनियंत्रित आयात करणार आहे. प्रश्न असा आहे सरकारची धोरणं ठरवणारे काय विचार करून असे निर्णय घेत असतील.


आजही कांदा उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी भावाने शेतकऱ्यांना विक्री करावी लागतं आहे.मार्च 2021 पासून सातत्याने कांदा भाव शेतकऱ्यांना किफायतशीर ठरलेला नाही.लगातार 2 वर्ष एखादे पिक मंदीत सापडले की पुढे ते पिक इतिहास घडवते . कांदा उत्पादनाच्या दृष्टीने सप्टेंबर ते नोव्हेंबर हे महिने सर्वात महत्त्वाचे महिने असतात.इथे जर भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असेल तर सहाजिकच ते पिक घेण्यासाठी शेतकरी टाळाटाळ करू शकतो.आज टोमॅटो ची अवस्था मे महिन्याच्या मंदी मुळे आलेली आहे तिथे जर शेतकऱ्यांना थोडे फार टोमॅटो पिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले असते तर आज ही वेळ आली नसती, असं शिवाजी हॉटेल यांनी स्पष्ट केलं.

उद्या कांद्याच्या बाबतीत असंच काहीसं झालं तर सरकार काय करणार आहे. प्रत्येक वेळी आयात करून सरकार प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असेल तर शेतकऱ्यांनी तरी का तोटा सहन करून शेती सांभाळावी? असा खडा सवाल शिवाजी आवटे यांनी उपस्थित केला आहे.

1.



 


"सरकारने 120 रुपये किलो टोमॅटो खरेदी करून ग्राहकांना 80 रुपये किलो दराने विक्री केली.तब्बल 40 रुपये किलो मागे खाणारांना अनुदान दिले आणि शेतकऱ्यांना कांदा अनुदान 3.50 रुपये किलो तेही भरमसाठ अटी आणि शर्ती ठेवून घोषणा केली आहे".

-शिवाजी आवटे, शेती बाजार विश्लेषक शेतकरी

2.



 


"गहू आणि तूर अनियंत्रित आयात करणार आहे. प्रश्न असा आहे सरकारची धोरणं ठरवणारे काय विचार करून असे निर्णय घेत असतील."

-शिवाजी आवटे, शेती बाजार विश्लेषक शेतकरी

3.



 


"कांदा उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी भावाने शेतकऱ्यांना विक्री करावी लागतं आहे.मार्च 2021 पासून सातत्याने कांदा भाव शेतकऱ्यांना किफायतशीर ठरलेला नाही.लगातार 2 वर्ष एखादे पिक मंदीत सापडले की पुढे ते पिक इतिहास घडवते . कांदा उत्पादनाच्या दृष्टीने सप्टेंबर ते नोव्हेंबर हे महिने सर्वात महत्त्वाचे महिने असतात."

-शिवाजी आवटे, शेती बाजार विश्लेषक शेतकरी

4.



 


"शेतमालाचा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असेल तर सहाजिकच ते पिक घेण्यासाठी शेतकरी टाळाटाळ करू शकतो.आज टोमॅटो ची अवस्था मे महिन्याच्या मंदी मुळे आलेली आहे तिथे जर शेतकऱ्यांना थोडे फार टोमॅटो पिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले असते तर आज ही वेळ आली नसती"

-शिवाजी आवटे, शेती बाजार विश्लेषक शेतकरी

5.



 


"उद्या कांद्याच्या बाबतीत टोमॅटो सारखी काहीसं झालं तर सरकार काय करणार आहे? प्रत्येक वेळी आयात करून सरकार प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असेल तर शेतकऱ्यांनी तरी का तोटा सहन करून शेती सांभाळावी".

- शिवाजी आवटे, शेती बाजार विश्लेषक शेतकरी

Tags:    

Similar News