राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिरायत-बागायती जमिनीसाठी हेक्टरी 10 हजार तर फळपिकांसाठी 25 हजार हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे ही मदत दिवाळीपूर्वी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र दिवाळी होऊन 8 दिवस उलटले असून,तरीही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. तर या विषयी शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत,हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी...