हाय टेन्शन वायर शेतात पडल्या
जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतातील विजेचा पोल पडला, शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त;
चोपडा तालुक्यात बऱ्याच शेतातील विजेचे पोल तिरकस झालेले आहेत. शेतकऱ्यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांना निदर्शनात आणून दिले नाही पेरणी सुरू झाल्याने शेतातील जमीन ओली होत असल्याने विजेचे खांब अजून तिरकस होत आहेत. काल रात्री गरताड भागामध्ये पाऊस जोरदार झाल्याने शेतातील हाय टेन्शनच्या पोल जमिनीवर पडल्याने संपूर्ण शेतात पडलेले होते. सकाळी शेतकरी जेव्हा शेतात आल्यावर त्यांना तार व पोल जमिनीवर पडलेले दिसल्याने तात्काळ वायरमन यांना सांगून वीज प्रवाह बंद केला. जर लक्ष राहिलं नसतं आणि कोणी त्या रस्त्याने गेले असते तर मोठी दुर्घटना झाली असती वारंवार सांगून लक्ष दिले गेले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.