Monsoon 2023 राज्यभरात पुढील दोन-तीन दिवसात अतिवृष्टी
राज्यात पुणे, सातारा, नाशिक घाट परिसरात तसेच रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट क्षेत्र, पालघर, ठाणे, मुंबईत येथे काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
छत्तीसगड आणि आजूबाजूच्या क्षेत्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्याने हे क्षेत्र मंगळवारी दुपारनंतर मध्य प्रदेशाच्या ईशान्य परिसरावर होते. तसेच त्याची तीव्रताही वाढली होती. हे क्षेत्र पुढील दोन दिवसांमध्ये मध्य प्रदेशाच्या वायव्य दिशेकडे सरकणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुणे, सातारा, नाशिक घाट परिसरात तसेच रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट क्षेत्र, पालघर, ठाणे, मुंबईत येथे काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
27/6:Latest obs at 10.15 pm. 🌧🌧☔
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 27, 2023
Palghar, S Konkan,S Mah & adj, N Vidarbha & adj Central MP, W & SW Rajasthan, parts of NE, off kerala KA coast watch for mod to intense spells next 2,3 hrs pl. pic.twitter.com/BuOd5Y3gGm
शेती आणि शेतकऱ्यांसाठी विभागनिहाय
विजय जायभावे ता. सिन्नर जि. नाशिक यांनी व्यक्त केलेला आज दिवसभरासाठी अंदाज..
दि. 28 जून 2023
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈
कोकण घाट परिसरात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस उत्तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागात देखिल 29/30 काही भागात चांगला पाऊस होईल 1/2/3/4 जुलै राज्यातील अंतर्गत भागात वळीव पाऊस अधून मधून सक्रिय होईल.4/5/6 जुलै विदर्भ आणि लगत च्या मराठवाडा भागात वळिव जोरदार पाऊस होईल.
28/29/30/1 जुलै राज्यात मान्सून सक्रिय राहील या काळात विजाचा पाऊस कमी होऊन मान्सून चा पाऊस सरू होईल या काळात विदर्भ उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्रचा घाटाचा भाग आणि लगत जोर अधिक राहील अशी शक्यता आहे
जुलै मध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि ऑगस्ट एल निनो तीव्र होणार असला तरी हिंदी महासागरावर iod देखिल जुलै पासून पॉजिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार आहे.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
उत्तर महाराष्ट्र 28 जून
जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजी नगर अहमदनगर काही भागात मध्यम पाऊस होईल.जळगाव, संभाजी नगर अहमदनगर, नाशिक भागात पाऊस 29/30 /1 जुलै जळगाव, धुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पावसाचा जोर वाढेल.नाशिक, अहमदनगर धुळे नंदुरबार घाट माथायावर तीव्र 60mm ते 70 mm पाऊस होईल आणि पूर्वे कडील भागात 40mm ते 50mm पाऊस होईल तर काही भागात मध्यम पाऊस होईल.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
कोकण सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई पालघर 28/29 /30जून पासून पुढे मुसळधार ते काही भागात 70mm 80 mm हुन अधिक पाऊस अतिमुसळधार पाऊस 2/3 जुलै पर्यंत पाऊस सुरु राहील..
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
मध्य महाराष्ट्र
पुणे,सातारा,कोल्हापूर, सोलापूर, सांगली पुढील दोन दिवस पाऊस पडेल तसेच 28/29/30 जून या भागात जोरदार पाऊस होईल 1/2/3/4 जुलै पाऊस काही भागात पडेल.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
मराठवाडा
28 जून पुढील दोन दिवस लातूर, नांदेड, हिंगोली,परभणी, बीड, धाराशिव ढगाळ वातावरण राहून वळीव सरीचा पाऊस काही भागात जोरदार वळिव पाऊस होईल 28/29 जून पर्यंत पाऊस राहील1/2 /3 जुलै देखिल पाऊस वाढलेला राहील
⛈️⛈️⛈️
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
विदर्भ 28 जून
पूर्व विदर्भ, नागपूर, गोंदिया ,वर्धा, यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती,अकोला बुलढाणा, वाशीम अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय झाला 28 ते 30 पूर्व विदर्भ मुसळधार पाऊस काही भागात होईल 30 जून पाऊचा जोर वाढलेला राहील जुलै संपूर्ण विदर्भात पावसात वाढ होण्याची शक्यता 3/4/5 जुलै वळिव पावसाला सुरवात होईल.