Weather Forecast: Monsoon 2023 मान्सूनने देश व्यापला: पुढील पाच दिवस धुवाधार: IMD

राज्यात मान्सून सक्रिय झाला असून पुढील पाच दिवस विजाचा पाऊस कमी होऊन मान्सून चा पाऊस सरू होईल या काळात विदर्भ उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्रचा घाटाचा भाग आणि लगत जोर अधिक राहणार आहे...;

Update: 2023-06-26 03:18 GMT

तब्बल महीनाभर लेट झालेला मान्सून (Monsoon) आता महाराष्ट्रातसह देशभर सर्वदूर पोहोचल्याने ठिक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. आज (ता. २६) पासून पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (orange alert) देण्यात आला आहे.राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने ( IMD)वर्तविली आहे.




ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून उत्तर पंजाबपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

आज (ता. २६) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. रत्नागिरी, रायगड, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.

उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.मान्सूनचे वारे पुन्हा सक्रीय झाल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये मान्सूनने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश पार करत दिल्लीपर्यंत झेप घेतली. तसेच गुजरात, राजस्थानच्या काही भागांमध्येही मान्सून रविवारी दाखल झाला.मुंबई आणि दिल्लीमध्ये तब्बल ६२ वर्षांनी मान्सून एकत्र दाखल झाला आहे. मुंबईमध्ये दोन आठवडे विलंबाने, तर दिल्लीमध्ये मात्र दोन दिवस आधी मान्सून दाखल झाला आहे.

निवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, सरासरी १० जून ला मुंबईत हजेरी लावणारा मान्सून, १५ दिवसाच्या उशिराने रविवार २५ जून ला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र काबीज करून वेगाने पुढे झेपावत जम्मू काश्मीर, लेह लडाख पर्यन्त मजल मारली आहे.




 

मान्सूनची कालची अधिकतम सीमारेषा वेरावळ बडोदा उदयपूर अंबाला कटरा ह्या शहरातून जाते. ६२ वर्षानंतर आज एकाच दिवशी मान्सून ने देशाची आर्थिक राजधानी मुंबई व राजधानी दिल्लीत हजेरी लावली.

बळकट व ताकदवान अश्या पश्चिमी मान्सूनी समुद्री वारे, कोकण ओलाचिंब करीत सह्याद्री ओलांडून पुढे वाटचाल केल्यामुळे रविवार दि.२५ जूनपासुन पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार २९ जूनपर्यंत  संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.

शुष्क वातावरणातून पावसाळी वातावरणातील बदल शेतकऱ्यांची मानसिकताही बदलवतो. ' पाऊस सुरु झाला', 'आता तो असाच पडेल'. 'नंतरही पडेल ', अश्या कल्पनांच्या गृहीतकावर पेर उरकवली जाते.

इतके दिवस पावसाने थांबवलेच होते तर अजुन एक आठवडा वाट बघून, ६ जुलै नंतर पूर्ण ओलीवरच पेरणी करावी.




आयओडी' ने पावसासाठी काय मदत करायची ती करू दे, पण 'एल-निनोचे वर्ष आहे, हंगाम पूर्णहोईपर्यन्त त्याचा विसर पडूच नये, असे माणिकराव खुळेंनी सांगितले.

 

पावसाचा जोर कशामुळे?

मान्सूनच्या सध्याच्या अनुकूल अवस्था व वातावरणीय प्रणाल्या कोणत्या? 👇

(i)अरबी समुद्रात कर्नाटक ते महाराष्ट्र अर्ध पश्चिम कि. पट्टीलगत तटीय हवेच्या कमी दाबाच्या  द्रोणीय 'आसा' मुळे तसेच  (ii)महाराष्ट्र पश्चिम कि.पट्टीवर आदळणाऱ्या पश्चिमी मान्सूनी समुद्री वाऱ्यामुळे (iii)गुजरात-महाराष्ट्र लगतच्या अ. समुद्र उत्तर कि. पट्टीवर बेचक्यात साडेतीन ते सहा किमी. उंचीवरील चक्रीय वाऱ्यामुळे (iv)बंगाल-ओरीसा पूर्व कि.लगत बं. उ. सागरात हवेचे मान्सूनी कमी दाब क्षेत्र निर्मितीमुळे साडेसात किमी. उंचीपर्यंत चक्रीय वाऱ्यामुळे (v)बं.उ. सागरातील कमी दाब क्षेत्र ते पंजाब पर्यन्त एक किमी. उंचीपर्यंत पसरलेला पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाबाचा 'आस' मुळे  मान्सून दोन्ही शाखासहित एकत्रित पुढे झेपावेल, असे वाटते. ह्यातील क्रं.(iv)मधील प्रणाली पुढील काही दिवस महाराष्ट्राला पावसासाठी अधिक अनुकूल ठरणार आहे. असे खुळेंनी शेवटी सांगितले.




 

- मुंबईमध्ये ११ जून ही मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख

- सन २०१९मध्येही सन २०२३प्रमाणे २५ जूनला मान्सून दाखल झाला होता

- सन २००९मध्ये २१ जून, सन २०१६मध्ये २० जून, तर सन २००५मध्ये १९ जूनला मान्सून मुंबईमध्ये दाखल

- गेल्या वर्षी ११ जूनला, सन २०२१मध्ये ९ जूनला आणि सन २०२०मध्ये १४ जूनला मान्सून मुंबईमध्ये दाखल

हवामान अभ्यासक विजय जायभाये म्हणाले, राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अरबी समुद्रावर पुढील 24 तासात ऑप्शल ट्रफ किनार पट्टीला तीव्र होईल.कोकण घाट माथ्यावर पाऊस वाढेल बंगाल च्या उपसागरावरील कमीदाबा पट्टा पश्चिम उत्तरे कडे सरकत आहे. विदर्भ उत्तर भागात 27/28 पासून पाऊस वाढेल पुढे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात 29/30 पर्यंत काही भागात पाऊस वाढेल कोकण घाट परिसरात नाशिक पुणे सातारा कोल्हापूर घाट भागात जोरदार पाऊस होईल पूर्वे कडे मध्यम पाऊस राहील.




27/28/29/  राज्यात मान्सून सक्रिय राहील या काळात विजाचा पाऊस कमी होऊन मान्सून चा पाऊस सरू होईल या काळात विदर्भ उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्रचा घाटाचा भाग आणि लगत जोर अधिक राहील अशी शक्यता आहे

जुलै मध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि ऑगस्ट एल निनो तीव्र होणार असला तरी हिंदी महासागरावर iod देखिल जुलै पासून पॉजिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार आहे

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

उत्तर महाराष्ट्र 26 जून

जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजी नगर अहमदनगर काही भागात मध्यम पाऊस होईल.जळगाव संभाजी नगर अहमदनगर नाशिक भागात पाऊस 27/28/29/30 जळगाव धुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पावसाचा जोर वाढेल नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार घाट माथायावर तीव्र 60mm ते 70 mm पाऊस होईल आणि पूर्वे कडील भागात 40mm ते 50mm पाऊस होईल तर काही भागात मध्यम पाऊस होईल



⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर   27/28/29 /30जून पासून पुढे मुसळधार ते काही भागात 70mm 80 mm हुन अधिक पाऊस अतिमुसळधार पाऊस 2/3 जुलै पर्यंत  पाऊस सुरु राहील.



⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

मध्य महाराष्ट्र  पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली पुढील दोन दिवस  पाऊस पडेल तसेच 28/29/30 जून या भागात जोरदार पाऊस होईल 1/2/3/4 जुलै पाऊस काही भागात पडेल.



⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

मराठवाडा 26 जून पुढील दोन दिवस लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड धाराशिव ढगाळ वातावरण राहून मान्सून चा पाऊस  26 जून काही भागात जोरदार वळिव पाऊस होईल 28/29 जून पर्यंत पावस राहील1/2 जुलै देखिल पाऊस वाढलेला राहील




 

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

विदर्भ 26 जून

पूर्व विदर्भ  नागपूर गोंदिया  वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला बुलढाना वाशीम अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय झाला 26/ 27/28 ते 30पूर्व विदर्भ मुसळधार 60 mm ते 70  mm पाऊस काही भागात होईल 30 जून पर्यंत  पाऊचा जोर वाढलेला राहील जुलै मध्ये संपूर्ण विदर्भात पावसात वाढ होण्याची शक्यता आहे, असं विजय जायभाये यांनी स्पष्ट केलं.




 



Tags:    

Similar News