Monsoon2023 पुढील पंधरा दिवस पावसाचे..

पुढील पंधरा दिवस मान्सूनचा आस असलेला पट्टा मध्य भारतात सक्रिय होणार आहे...;

Update: 2023-07-16 04:18 GMT

:पुढील पंधरा दिवस मान्सूनचा आस असलेला पट्टा मध्य भारतात सक्रिय होणार असून बंगाल च्या उपसागरावर एका पाठोपाठ एक कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन पश्चिम वायव्य दिशेने प्रवास करतील एक प्रकारची सायकल निर्माण होणार आहे 17/18 जुलै पहिला कमी दाब निर्माण होईल राज्यात याचा प्रभाव 18/19/20 जुलै राहणार आहे दुसरा कमी दाब 20जुलै ला निर्माण होईल. तिसरा कमी दाब 24/25 जुलै पासून सक्रिय होईल, असा अंदान हवामान अभ्यासक शेतकरी विजय जायभाये यांनी व्यक्त केला आहे.


बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे १७ जुलैपासून राज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह सर्वदूर चांगला पाऊस अपेक्षित आहे. जुलैअखेर मोसमी पाऊस राज्यातील सरासरी भरून काढेल, असा अंदाज हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तविला. होसाळीकर म्हणाले, की कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस झाला आहे. पण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १७ जुलैपासून विदर्भ, मराठवाडय़ात चांगला पाऊस होईल. महिनाअखेपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलैअखेर मोसमी पाऊस राज्यातील सरासरी भरून काढेल. बंगालचा उपसागर ते राजस्थानपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांत उत्तर भारतात चांगला पाऊस झाला आहे.

राज्यभर मान्सूनचा पाऊस यंदा उशिरानं दाखल झाला आहे. राज्यातील अनेक भागात जूनपाठोपाठ जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाची ओढ कायम राहिली आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा, काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, तर मराठवाडय़ात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मान्सूनची सध्याची अवस्था काय?

1

मराठवाडा

१४,१५ व १७ ते २१ जुलै, मध्यम ते मुसळधार


 

2

विदर्भ

१४ ते १६जुलै मुसळधार तर १७ जुलै पासून जोरदार


3

मध्य महाराष्ट्र

१४,१५ जुलै केवळ मध्यमच तर १६ ते १९ जुलै मुसळधार


4

मुंबईसह कोकण  जोरदार सुरु असलेला पाऊस कायम 



5

मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता कशामुळे?


  "अरबी समुद्रातील मावळलेला 'ऑफ-शोर-ट्रफ ' ची पुन्हा गुजरात ते केरळ किनार पट्टी दरम्यान झालेली पुर्नस्थापना आणि नेहमीपेक्षा दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा पूर्व-पश्चिम मुख्य आस आणि मुख्य आसातून दक्षिण उत्तरप्रदेशातील फतेहपूर शहरापासून पासून गुजरात राज्यपर्यन्त २ किमी. पासून ते ३ किमी. उंचीपर्यन्तच्या एक किमी.हवा जाडीत  पसरलेला त्या मान्सूनच्या आसाचा एक फाटा ह्यामुळे कोकणाबरोबरच  खान्देश ते सोलापूर पर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात (विशेषतः घाटमाथा) सध्याची पावसाची ही शक्यता वाढली आहे.




6

  पश्चिम बंगालच्या उपसागरात आंध्रतील नेल्लोर ओंगोल शहरालगत पूर्व कि.पट्टीसमोर खोल समुद्रातील पृष्ठभागा पासून वर उंच साडेचार किमी.नंतर ते साडेसात किमी. पर्यन्तच्या ३ किमी. हवा जाडीत घडून येणाऱ्या चक्रीय वाऱ्याच्या अभिसरणीय प्रणालीतून विदर्भातही पावसाची शक्यता वाढली आहे.  



7.

   रविवार दि.१६ जुलैला ओरिसा कि. पट्टीसमोर पश्चिम बंगालच्या उपसागरात एक नवीन 'चक्रीय-वारा अभिसरण' प्रणाली निर्मिती अपेक्षित आहे.


8

" बुधवार दि.१९ जुलै ला त्याच ठिकाणी ह्या प्रणालीचे रूपांतर कमी दाब क्षेत्रात तर शनिवार दि.२१ जुलै दरम्यान तेथेच तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होवून त्याचे वायव्य दिशेने मध्य भारताकडे मार्गक्रमण होणार आहे."


 



9

पेरणीवर शेवटचे भिस्त

"शनिवार २१ जुलै नंतरच्या (२१ ते २७जुलै) आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता असुन ह्याच पावसावर शेवटच्या टप्प्यातील खरीपाची पेरणीची भिस्त अवलंबून आहे"




10.

अजून एल-निनो नाही

"' एल- निनो ' अजुनही विकसित झालेला नाही. एन्सोच्या तटस्थ ( ना,' एल-निनो ' वा ना ' ला-निना ' अवस्था) अवस्थेतून तो एक ऑगस्ट दरम्यान  एल- निनोच्या अवस्थेत एन्ट्री करू शकतो. त्या नंतर त्यापुढील आठ महिने (म्हणजे मार्च २०२४अखेर)पर्यन्त कार्यरत असेल."




११.

" 'मॅडन ज्युलीअन ऑसिलेशन '(एमजेओ)  सध्या भारत महासागरीय विषवृत्तीय प्रक्षेत्रात बुधवार दि. १९ जुलैपर्यन्तची उपस्थिती भलेही एम्प्लिटुड एकपेक्षा कमी  असला तरी सध्याच्या मान्सून काळात पावसाची गतिविधिता वाढवण्यास त्याचीही मदत होण्याची शक्यता आहे."




१२ 

उत्तर भारतात आणखी एक पश्चिमी झंजावात

"उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील चालु असलेली अतिवृष्टी ओसरते-ना-ओसरते तेच अजुन एक नवीन  पश्चिमी झंजावात येण्याच्या तयारीत आहे."

माणिकराव खुळे

Meteorologist (Retd.)

IMD Pune.


 



1.

"पुढील पंधरा दिवस मान्सूनचा आस असलेला पट्टा मध्य भारतात सक्रिय होणार असून बंगाल च्या उपसागरावर एका पाठोपाठ एक कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन पश्चिम वायव्य दिशेने प्रवास करतील एक प्रकारची सायकल निर्माण होणार आहे 17/18 जुलै पहिला कमी दाब निर्माण होईल राज्यात याचा प्रभाव 18/19/20 जुलै राहील दुसरा कमी दाब 20जुलै ला निर्माण होईल तिसरा कमी दाब 24/25 जुलै पासून सक्रिय होईल"

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️




 


2.

17/18/19 जुलै विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पावसाचा जोर वाढेल

कोकण पश्चिम महाराष्ट्र ऑफशोर ट्रफ निर्माण होऊन मुसळधार पाऊस होईल.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

 


3.

20 जुलै नंत्तर साधारण कमी दाब सतत सक्रिय राहून उत्तरे कडील महाराष्ट्र उत्तर पूर्व विदर्भ मराठवाडा व कोकण या भागात पाऊस सक्रिय राहील दक्षिण महाराष्ट्र कडे पाऊस साधारण मध्यम पाऊस होईल.



विजय जायभावे

ता. सिन्नर. जि. नाशिक

पुढील आठवड्यात पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील आठवड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

उत्तर भारतात जोरदार बॅटिंग

उत्तर आणि वायव्य भारतामध्ये काही दिवस झालेल्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत हवामान विभागाच्या ३६पैकी सात उप‌विभागांत सरासरीपेक्षा ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, सौराष्ट्र व कच्छ, पंजाब, हरियाना, पश्चिम राजस्थान, चंडीगड व दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या सात उपविभागांमध्ये प्रचंड पाऊस झाला. हिमाचल प्रदेशात १६८ टक्के पाऊस झाला. सौराष्ट्र व कच्छ या उपविभागात १५९ टक्के जास्त पाऊस झाला. पंजाबमध्ये १२४ टक्के, दिल्लीमध्ये ११० टक्के, राजस्थानमध्ये ३६ टक्के जास्त पाऊस झाला.

Tags:    

Similar News