कमी दाबाच्या पट्ट्याने दुष्काळी पट्ट्यात पाऊस:विजय जायभावे

मध्य महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विभागातील अनेक भागात पाऊस होईल.;

Update: 2023-09-23 04:45 GMT

अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागरात सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ चक्रीवादळ निर्माण होण्याचा असतो. कारण सूर्य विषुवृत्तावर 23 सप्टेंबर रोजी लंबवत होतो आणि समुद्रातील तापमानात बदल होऊन तीव्र कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्यामुळे पाऊस आणि चक्रीवादळ निर्माण होत असतात. त्यातच अल निनोचे वर्ष असेल तर अधिक झापट्याने ही परिस्थिती निर्माण होते किंवा मोठे वादळ देखील निर्माण होतात. जसे बिपरजॉय 6 जून ला निर्माण झाले होते.

मार्च ते मे हा कालावधी देखील वादळ निर्माण होण्याचा असतो .कारण २३ मार्च ला सूर्य पुन्हा विषुवृत्तावर असतो. त्यावेळी IOD+ MJO हे घटक देखील सक्रिय परिस्थिती आहे.

पुढील काळात म्हणजे सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यातच समुद्रावर हालचाली सरू होणार आहेत. त्या संभावित परिणाल्याचे मार्ग आपण वरील मॅप मध्ये दर्शवले आहे. आणि त्या नंत्तर च्या काळात देखील असेच प्रभावी सिस्टम निर्माण होणार आहे. त्याचा मार्ग देखील शक्यतो असाच असतो. 26/27 सप्टेंबर अरबी समुद्रावर कमी दाबचा पट्टा तयार होणार आहे. याचा परिणाम म्हणून मध्य महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विभागातील अनेक भागात पाऊस होईल आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावर निर्माण होणारा कमीदाबाचा पट्टा राज्याच्या दिशेचा मार्ग पकडला तर त्यात देखील पाऊस होईल.


आज राज्यातील पावसाची परिस्थिती वरील मॅप मध्ये दर्शवली आहे. त्यात रेड भागात मध्य महाराष्ट्र, पुणे, अहमदनगर, नाशिक, संभाजी नगर, जळगावचे काही भाग धुळे काही भाग पालघर, ठाणे, कोकण या भागातील काही तालुक्यात तीव्र मुसळधार तर काही भागात जोरदार वळिव पाऊस होण्यासाठी पोषक परिस्थिती आज देखिल सक्रिय आहे. 24 सप्टेंबर थोडा जोर कमी होईल 26/27/28 पुन्हा जोर वाढेल.

यलो भागात दक्षिण महाराष्ट्र राहिलेला मराठवाडा विदर्भ या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल या भागात देखील 25/26/27/२८ तारखेला पाऊस वाढेल.


Tags:    

Similar News