या, रानभाज्या तुम्ही पाहिल्या आहेत का?
पनवेलसह नवी मुंबई मध्ये किरकोळ बाजारात रानभाज्या विक्रीसाठी दाखल
पाऊस ( Monsoon) सुरु झाल्यावर बाजारात रानातल्या भाज्या ( Forest Vegetable) दाखल होतात,पनवेलसह नवी मुंबई मध्ये किरकोळ बाजारात रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात येत आहेत, आदिवासी नागरिक (Tribals) जंगलातून रानभाज्या आणतात आणि विक्री करतात. पावसाळ्यामध्ये या भाज्यांना मोठी मागणी असते, सध्या बाजारात अंबाडी, कुलू, भारंगी, टाकळा, अळू, शेवाळा आदी रानभाज्या उपलब्ध आहेत, रानभाज्या या स्वस्त असतात त्यामुळे सर्वसामान्य खरेदी देखील करतात, 20 ते 30 रुपयांपासून भाज्यांची एक जुडी विकली जाते, त्यामुळे पावसाळ्यात आदिवासी नागरिकांना देखील रोजगार मिळतो. रानभाज्या या स्वस्त असतात. आदिवासी महिला रानावनात फिरून रानभाज्या मिळवतात. आदिवासी महिलांना (Tribal women) रानभाज्या विकून रोजगार मिळतो,आणि त्यातूनच त्यांच घर चालते, असे येथील रानभाज्या विकणाऱ्या महिला शीला पवार यांनी सांगितले पहा.. MaxKisan चा रिपोर्ट