राज्यात वादळी पावसाचे संकट कायम
Weather Update राज्यभर सूर्यनारायण तळपू लागल्याने उन्हाचा (Heat) चटका चांगलाच बसत आहे.सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद असून राज्यात वादळी पाऊस Stormy Rain) सुरू असून, आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा (Rain Forecast) इशारा असून उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.;
Weather Update राज्यभर सूर्यनारायण तळपू लागल्याने उन्हाचा (Heat) चटका चांगलाच बसत आहे.सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद असून राज्यात वादळी पाऊस Stormy Rain) सुरू असून, आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा (Rain Forecast) इशारा असून उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उन्हाचा चटका असह्य होऊ लागल्याने घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूरसह ब्रह्मपूरी येथे तापमान ४३ अंशांवर होते.
वर्धा येथे ४२ अंश, सोलापूर, अमरावती, नागपूर येथे तापमान ४१ अंशांच्या पुढे पोचले आहे. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून ३६ ते ४१ अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका वाढतच आहे.
Rain Forecast
नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
तर उत्तर छत्तीसगडपासून, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक पर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडीत वारे वाहत आहेत.
या पूरक स्थितीमुळे आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
मराठवाडा : धाराशिव, लातूर.
विदर्भ : बुलडाणा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.
भारतीय हवामान विभागाने नुकत्य़ाच दिलेल्या अंदाजानुसार येत्या जून ते सप्टेंबर ४ महिन्याच्या दिर्घ कालावधी सरासरी नुसार देशात सरासरी इतका म्हणजे ९६ % ± ५ पावसाची शक्यता वर्तवली आहे. म्हणजे देशात ह्या वर्षी सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे.
देशात ९६ ते १०४% श्रेणीत पडणारा पाऊस हा सरासरी पाऊस मानला जातो. महाराष्ट्रातही येत्या जून ते सप्टेंबर ४ महिन्यात 'टरसाइल' प्रकारनुसार सरासरी पेक्षा जरी कमी पावसाची शक्यता दर्शवत असली तरी उत्कृष्टपणे पावसाचे वितरण झाल्यास तो सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे.
नकारात्मक शक्यतेच्या अंकानुसार जरी विचार केला तरी ही शक्यता (९६-५) ९१% आहे. कि जी सरासरीपेक्षा कमी पावसाची आहे. तरी देखील टंचाईसदृश अवस्थेची परिस्थिती येणार नाही. म्हणजेच दुष्काळाची शक्यता अजिबात जाणवत नाही.
पावसाळ्याच्या कालावधीत विकसित होणारा 'एल -निनो' पण त्याचबरोबर भारतीय महासागरात विकसित होणारी धन ' भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ' (पॉझिटीव्ह इंडियन ओशन डायपोल) ह्या अवस्था एकमेकांना काटशाह देऊन देशाला सरासरी इतका पाऊस देणार आहे.
प्रॉबॅबिलीटीच्या भाषेत सर्वाधिक 'भाकित संभाव्यता ' ही ३५ % तर सर्वाधिक 'हवामान संभाव्यता' ही ३३% आहे.
'भाकीत शक्यता' म्हणजे ह्या संपूर्ण २०२२-२३ वर्षात जागतिक पातळीवरून भाकीतासाठी आवश्यक असलेली सर्व गोळा केलेली निरीक्षणे व त्यावरून ठरवलेली शक्यता आहे. तर 'हवामान संभाव्यता' म्हणजे भाकीतासाठी आतापर्यंत उपलब्ध असलेल्या डेट्यावरून ठरवलेली शक्यता होय.