दोन महिन्यापासून पावसाने दडी मारली असल्याने निफाड तालुक्यातील विंचूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून अक्षरशः द्राक्ष बाग सुकायला लागली आहे.
द्राक्ष पंढरी म्हणून निफाड तालुक्याची ओळख असून विंचूर येथील द्राक्ष बागांना पावसाअभावी फटका बसताना दिसत आहे. बागेला पाणी मिळत नसल्याने द्राक्ष बागांमधील अन्नरस कमी होऊन लागला आहे. कडाक्याचं ऊन पडत असल्याने अक्षरशः द्राक्ष बागेची पानं देखील वाळत असल्याने द्राक्ष उत्पादकांपुढे नवं संकट उभे राहिले असून यामुळे द्राक्षाच्या उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी विलास राऊत आणि शंकर दरेकर सांगत आहेत.