द्राक्ष पिकांची काढणी सुरू पण हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱी आंदोलनात हमीभाव एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हमीभावाचा कायदा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. या हमीभावाची गरज काय आहे याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

Update: 2021-02-17 11:45 GMT

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱी आंदोलनात हमीभाव एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हमीभावाचा कायदा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. या हमीभावाची गरज काय आहे याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. राज्यभरात द्राक्षांच्या काढणीला सुरूवात झाली आहेत. सांगली जिल्ह्यातील तासगावातही अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या मोबदल्याच्या अपेक्षेने द्राक्षाची लागवड केली होती. आता द्राक्षांची काढणी सुरू झाली आहे मात्र दर पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आहे. दरवर्षीपेक्षा यंदा किमतीची घसरण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. गेल्या वर्षात कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पण याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी जिद्द न सोडता आपली पिके टिकवली आहेत. तर काही द्राक्षबागांची आता काढणी चालू झाली आहे. मात्र या पिकाला आता दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे.

Full View

सध्या बाजारात द्राक्षांना दर मिळत नाही. व्यापाऱ्यांनीचे संगनमताने द्राक्षांचे दर पाडले असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. शेतकरी हा जीवाचे रान करून आपली पिके व उत्पादन घेत असतो, मात्र येणारे व्यापारी हे अतिशय तुटपुंजा दर देऊन तो माल विकत घेऊन जातात. शेतीचा खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पण व्यापाऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे माल बाहेर जाऊ शकत नाही असे कारण हे व्यापारी देता आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष पिकांना दर कमी झाला असल्याचा दावा व्यापारी करत आहेत. सुपर सोनाका एस.एस. अनुष्का या द्राक्ष पिकांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. या जातीच्या द्राक्षांचा चांगला भाव आहे कारण ते जास्त गोड आहेत. पण शेतकरी आंदोलनाचा आणि द्राक्ष बाहेर जाण्यचा काय संबंध यावर मात्र हे व्यापारी काहीही बोलत नाहीत.

Delete Edit


Tags:    

Similar News