बाप्पावरही दुष्काळाचे सावट
बीड जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी दरवर्षी बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात होत असते मात्र यंदा दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने बीडच्या गेवराई मध्ये बाप्पावरही दुष्काळाचे सावट पडल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी दरवर्षी बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात होत असते मात्र यंदा दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने बीडच्या गेवराई मध्ये बाप्पावरही दुष्काळाचे सावट पडल्याचे दिसून येत आहे.गेवराई शहरातील गणपती मार्केट सह सजावटीचे साहित्य खरेदीकडे देखील नागरिकांनी पाठ फिरवली आहे.दरवर्षी थाटामाटात साजरा होणारा गणेशोत्सव यावर्षी मात्र साध्या पद्धतीने साजरा होणार असल्याचे चित्र दिसते आहे.गणेशमूर्ती सह ,सजावटीचे साहित्य व हार फुलांच्या किंमतीत देखील वाढ झाल्याने बाजारपेठांमध्ये हवी तेवढी गर्दी दिसून येत नाही आहे.तर मुर्त्यांची विक्री होत नसल्याने मुर्तीकार चिंतेत आहेत.