सोयाबीनचे बियाणे निघाले बोगस ; शेतकऱ्यांची फसवणूक
केवळ पीक वाढले मात्र त्याला शेंगाच लागल्या नसल्याने पिंपरीच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाग बियाणे आणून केलेली सगळी मेहनत वाया गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.;
पिंपरी महिपाल गावात शेतकऱ्यांची सोयाबीनच्या बियाण्यांत फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनला फलधारणाच झाली नाही. केवळ पीक वाढले मात्र त्याला शेंगाच लागल्या नसल्याने पिंपरीच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाग बियाणे आणून केलेली सगळी मेहनत वाया गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. सरकारने या प्रकाराची दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.