हवामान अंदाजातील बुवाबाजी

यंदा राज्यावर दुष्काळी संकट घोंगावत असताना वारे माप पद्धतीने बोगस अंदाज व्यक्त करून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे हवामान अंदाज म्हणजे बुवाबाजी असल्याचं ठाम मत शेती अभ्यासक डॉ. सोमनाथ घोळवे यांनी व्यक्त केला आहे.;

Update: 2023-08-25 15:39 GMT

बुआबाजी ही केवळ धार्मिक क्षेत्रात असते असे राहिले नाही. तर अलीकडे खासगी हवामान तज्ज्ञांच्या (पाऊसाचे अंदाज) रूपाने फोववली आहे. ही बुआबाजी केवळ पाऊसाचे अंदाजाच्या तारखा सांगून थांबत नाही तर कोणते बियाणे, कोणत्या रासायनिक खतांचे डोस द्यावेत हे देखील सोशल मीडिया आणि भाषणांमधून / कार्यक्रमांमधून सांगत आहेत.



चालू हंगामात या बुआनी सांगितलेल्या तारखांना पाऊस तर पडला नाही. मात्र शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि बियाणे खरेदी करायला लावून या कंपन्यांला अमाप नफा कमवून दिला आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडे एका खासगी हवामान तज्ज्ञाने जाहीर केलेल्या 16 ते 24 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यानिहाय नावे सांगून राज्यात सर्वत्र पाऊस पडणार असल्याचे जाहीर केले होते. (पहा फोटो) पण पाऊस झाला नाही. उलट पाऊस पडेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी खते खरेदी करून ठेवली आहेत.



 या हवामानाचे अंदाज सांगणाऱ्या बुआनी पाऊसाचे अंदाजाच्या तारखा जाहीर केल्या तर शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची खरेदी करण्याचे प्रमाण वाढते. पाऊसाच्या अंदाजाच्या तारखा लवकर जाहीर केल्या नाहीत तर खते -बियाणे खरेदी चे व्यवहार कमी होतात. अर्थात बुआंकडून पाऊस पडणाऱ्या तारखा जाहीर होण्यावर खतांच्या आणि बियाणे खरेदी-विक्रीचे व्यवहारात जी-मंदी काही प्रमाणात येऊ लागली आहे. त्यामुळे खाजगी हवामानाचा अंदाज सांगणारे- देणारे जर बियाणे-रासायनिक खते कोणती पेरवीत असे सांगायला लागले तर समजावे की खासगी हवामान तज्ज्ञ (बुआ) खते-बियाणे कंपन्यांसाठी कामे करायला लागले आहेत. त्यांना हप्ते किंवा कंपन्यांकडून देणगी मिळते का हे तपासायला हवे.




बुआनी सोसिल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगलेच प्रस्थ वाढले आहे.... (हवामान विभागाचे अचूक अंदाज येत नसल्याने या खासगी हवामान तज्ज्ञांना शेतकऱ्यांच्या मनावर ताबा मिळवण्यास अवकाश मिळालेला आहे) चालू वर्षात तर या बुआनी (खासगी हवामान तज्ज्ञानी) बियाणे-खतांच्या कंपन्यांचे बाजूने अंदाज देण्यामुळे दुष्काळी-कोरडवाहू परिसरातील शेतकऱ्यांनी कमी पाऊस झालेला असतानाही पेरणी केली आहे. आता शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या तज्ज्ञाकडून पाऊस चांगला होणार आहे असे जाहीर केले नसते तर शेतकरी कमी पाऊसावर येणाऱ्या पर्यायी पिकांकडे वळले असते.





सोमिनाथ घोळवे

25 ऑगस्ट 2023

Tags:    

Similar News