गणेशउत्सवानिमित्त झेंडूच्या फुलांचे दर वधारले
झेंडूला 50 ते 60 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे. यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.;
बारामती तालुक्यातील झारगडवाडी, डोरलेवाडी या भागातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात झेंडू या फुलांची ठिबक, मल्चिंग आदीचा वापर करून आधुनिक पद्धतीने लागवड करतात. गेल्या दोन दिवसांपासून बाजारामध्ये गणेश उत्सवामुळे झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गणेशोत्सवामुळे बाजारात झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्यामुळे झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे मात्र झेंडू फुले उत्पादन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. किरकोळ खरेदी दारांकडून झेंडूच्या फुलांची मोठी मागणी होत आहे. मागील एक महिना झेंडूच्या फुलांना भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र आता झेंडूला 50 ते 60 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे. यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.