फुलांची मागणी वाढली: उत्पन्न घटले
नवरात्रोत्सवानिमित्त झेंडूच्या फुलांची मागणी वाढली पण पाण्याअभावी पीक घटल्याने शेतकरी चिंताग्रस्त..;
नवरात्रोत्सवा निमित्त झेंडूच्या फुलांची मागणी वाढते. गुजरात, सुरत, मुंबई, धुळे, भुसावळ, इंदोर व इतर ठिकाणी झेंडूच्या फुलांना प्रामुख्याने मागणी आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांची चांगल्या प्रकारे विक्री होते. त्यामुळे शेतकरी वर्ग हा झेंडूच्या फुलांचे चांगले उत्पन्न घेत असतो. मात्र यावर्षी चांदवड तालुक्यातील परिसरात पाहिजे तसा मोठा पाऊस झाला नसल्यामुळे झेंडूच्या फुलाचे पीक हे पाण्याअभावी घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकांचा लागवड खर्च निघेल कि नाही याची चिंता आता शेतकऱ्याला वाटत आहे.