श्रावण महिन्यात मेथीला (fenugreek) प्रचंड प्रमाणात मागणी असते,तसेच भाव देखील वाढलेले असतात.मात्र यावर्षी सततच्या पडणाऱ्या पावसामुळे मेथीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळत आहे.मेथीची एक जुडी आठ रुपये ते दहा रुपये पर्यंत विकली जात आहे.मात्र पंधरा दिवसांपूर्वी 25 ते 30 रुपयांना विकली जात होती.मात्र सध्या मेथीच्या भाजीला कवडीमोल भाव मिळत आहे आवक वाढल्यामुळे आणि स्वतःच्या पावसामुळे भाजीच्या दरात घसरण झालेली आहे शेतातून येणारा माल हा ओला असल्यामुळे भाजी लवकर खराब होते त्यामुळे ग्राहक देखील याकडे पाठ फिरवत आहेत.