उत्पादन वाढल्याने अतिरिक्त झालेल्या कांदा (Onion) उत्पादकाने मार्केट डाऊन होते. अशा परिस्थितीत शेतकरी कांदा फेकून जनावरांना चारण्याचेही प्रकार घडले होते. याच अडचणीला संधी मानत खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा येथे काही महिला शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून त्यावर प्रक्रिया करत आहे. कांदा शेतकऱ्याकडून खरेदी करतात त्याची साल काढतात त्याला स्वच्छ धुऊन काढतात. त्याच्या चकल्या बनवून मशीन मध्ये सुकवतात आणि सुकल्यानंतर स्वच्छ पिशवीमध्ये भरून कंपनीला देत आहेत. त्यातून त्यांना चारशे ते पाचशे रुपये रुपयांपर्यंत रोजगार मिळत आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून (Self Help Group)कांद्यावर प्रक्रिया करून त्याच कांद्यामधून उपयुक्त असे बनवत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अडचणीला मोठी संधी आणि रोजगार मिळाल्याचे कावेरी बोरसे आणि कविता जाधव या बचत गटांच्या महिलांनी सांगितले आहे..