पाऊस लांबला, पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्याला मोठ्या पावसाची प्रतिक्षा
विभागीय आयुक्तांनी खरीप पेरणीपुर्वी शेतकऱ्यांना १० हजार मदतीची शिफारस केली. मात्र शासनाने काहीच निर्णय घेतला नसून पेरणी लांबल्यास उत्पन्न कमी येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगत आहेत.;
यंदा पाऊस लांबल्याने खरीप (kharip) पेरण्या खोळंबल्या असून बळीराजा(Farmer) काळ्या आईची ओटी भरण्यासाठी नांगरण, मोगडन, पाळी घालून परिस्थिती नसतानाही खत, बी-बियाणे घेऊन सज्ज झाला आहे. प्रतिक्षा आहे ती मोठ्या मान्सुनची. गतवर्षी जून १० पासून पेरण्या सुरु झाल्या होत्या. मात्र यंदा जून संपत आला तरी अद्याप दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून मुलांच्या शाळा व पेरणी एकत्र येत असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाल्या आहेत. विभागीय आयुक्तांनी खरीप पेरणीपुर्वी शेतकऱ्यांना १० हजार मदतीची शिफारस केली. मात्र शासनाने काहीच निर्णय घेतला नसून पेरणी लांबल्यास उत्पन्न कमी येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगत आहेत.