संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलावरच फेकल्या नोटा...

शेतीचे सातत्याने नुकसान होत आहे सरकार कडून घोषणा होत आहे, मात्र भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम आता सुटत चालला आहे.;

Update: 2023-05-04 08:20 GMT


गेल्या आठवड्याभरापासून राज्यभर पाऊसाने आणि गारपिटीने धुमाकूळ घातला आहे. जळगाव जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे भुसावळ परिसरात गारा पडल्या. सर्वात जास्त नुकसान कांदा पिकांचे झाले. कृषी विभागाने पंचनामे केले मात्र काही ठिकाणी कोर्‍या कागदावर स्वाक्षर्‍या घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आज भुसावळ तालुका कृषी अधिकार्‍यांच्या कार्यालयात येऊन जाब विचारला मात्र त्या ठिकाणी संबंधित अधिकारी हजर नसल्याने त्यांच्या टेबलवर नोटा व सडके कांदे टाकून शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला.

शेतीचे सातत्याने नुकसान होत आहे सरकार कडून घोषणा होत आहे, मात्र भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम आता सुटत चालला आहे.

Full View

अवकाळीच्या पाऊसाने पिकांना फटका बसला आहे.

मात्र अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना मदतही नाही आणि पंचनामेही नाही. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी थेट भुसावळ तालुका कृषी कार्यालय गाठले. या कार्यालयात शेतकर्‍यांना एकही अधिकारी दिसून न आल्याने संतप्त शेतकर्‍यांनी कृषी अधिकार्‍याच्या टेबलावर नोटा आणि सडलेले कांदे फेकत संताप व्यक्त केला आहे. कृषी सहाय्यकाकडून कोर्‍या कागदावर सह्या घेऊन अंदाजे पंचनामे केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला.

Tags:    

Similar News