Farmer's News | कृषी पंपाच्या विजदरात वाढ...! किती असेल नविन युनिट दर?

Update: 2024-04-18 10:58 GMT

शेतकरी बांधवानो, महावितरण कडून आता कृषि पंपाच्या (Agricultural pump) वीजदरात बदल करण्यात आला असून आता नवीन वीजदर(Mahavitaran Rates) लागू करण्यात आले आहेत. वीज नियामक आयोगाने ह्या महावितरणच्या वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे.

तर, आता कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी सहा ते आठ टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. कृषी पंपाच्या वीजदरात 12% वाढ केल्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणने दर वाढ करून एक प्रकारचा जोरदार धक्का दिला आहे.

कसे असणार हे नवीन दर ? (Mahavitaran Rates)

लघुदाब शेती पंपासाठी 2022-23 ला 3.30 रुपये प्रतियुनिट दर होता. 2024-25 ला हा दर 4.56 रुपये प्रतियुनिट झाला आहे. उच्चदाब शेती पंपासाठी अगोदर 4.24 रुपये प्रतियुनिट दर होता. 2024-25 साठी तो 6.38 रुपये एवढा झाला आहे.

नवीन दर (रु./प्रती यूनिट)

लघुदाब

3.30 रुपये/प्रतियुनिट

4.56 रुपये/प्रतियुनिट

उच्चदाब

4.24 रुपये/प्रतियुनिट

6.38 रुपये/प्रतियुनिट

शेतीमध्ये कोणत्या प्रकारचा पंप वापरला जातो?

शेतीमध्ये वापरलेले सामान्य पंप म्हणजे सेंट्रीफ्यूगल पंप आणि बोअरवेल सबमर्सिबल पंप. मात्र, अलीकडच्या काळात सौरपंपांनाही जोर आला आहे.

कोणता पाण्याचा पंप चांगला आहे?

सेंट्रीफ्यूगल जेट पंप - हे भूगर्भातून येणाऱ्या पाण्यासोबत पाण्याचा स्थिर आणि मजबूत प्रवाह प्रदान करतात. खोलीवर अवलंबून, आपण केंद्रापसारक खोल विहीर जेट किंवा उथळ विहीर जेट पंप मिळवू शकता. हे पंप 25 फूट खोलीपासून पाणी उचलू शकतात. सेंट्रीफ्यूगल जेट पंप देखील कार्यक्षम आणि स्थापित करण्यास सोपे आहेत.

Tags:    

Similar News