सत्तेत येण्यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्र सादर करत हे शक्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने नवीन कृषी सुधारणा कायदा केला आहे. हा कायदा केल्यानंतर शेतकऱ्यांचे अच्छे दिन येणार असं सांगितलं जात आहे. मात्र, या कायद्याने शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार का? असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असून या पत्रात शेतकरी कायद्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.