सहकार मंत्र्यांचे तोंड काळं की गोरं?
बीड (beed)जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे फार मोठे नुकसान झाला आहे. राज्यातील शेतकरी बांधव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे अक्षरशः हैराण झाला आहे. शेतकरी संकटात असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कुठेही दिसत नाहीत त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य पूजा मोरे (pooja more)यांनी फेसबुक पोस्टद्वारे थेट पालकमंत्र्यांना इशारा दिला होता. काल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे ध्वजारोहणासाठी बीडमध्ये आले होते. यावेळी मोरे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले. हे निवेदन देत असताना त्यांनी त्यांना "तुम्ही काळे आहात की गोरे आहात हे आज दिसलं" असं म्हणत थेट डिवचले.. त्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांच्या हातातील निवेदन घेत तिथून पळ काढला.;
बीड (beed)जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे फार मोठे नुकसान झाला आहे. राज्यातील शेतकरी बांधव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे अक्षरशः हैराण झाला आहे. शेतकरी संकटात असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कुठेही दिसत नाहीत त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य पूजा मोरे (pooja more)यांनी फेसबुक पोस्टद्वारे थेट पालकमंत्र्यांना इशारा दिला होता. काल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे ध्वजारोहणासाठी बीडमध्ये आले होते. यावेळी मोरे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले. हे निवेदन देत असताना त्यांनी त्यांना "तुम्ही काळे आहात की गोरे आहात हे आज दिसलं" असं म्हणत थेट डिवचले.. त्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांच्या हातातील निवेदन घेत तिथून पळ काढला.
मागच्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पूजा मोरे यांनी पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट द्यावी त्यांची समस्या जाणून घ्यावी यासाठी आवाज उठवला होता. बीडमध्ये अतुल सावे बेपत्ता असल्याचे पोस्टर्स सुद्धा ठिकठिकाणी लागले होते. याचबरोबर अतुल सावे यांना शोधल्यास 51 हजार रुपयांचे बक्षीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं होतं.
या सगळ्या प्रकारानंतर पूजा मोरे यांनी फेसबुक वर एक पोस्ट करत थेट पालकमंत्र्यांना इशारा दिला. "एकदाही पालकमंत्र्यांनी बीड जिल्ह्याला तोंड दाखवलेलं नाही. बीड जिल्ह्यातील आमदारांचे फोन पालकमंत्री उचलत असतील तर या म्हणाव त्यांना गारपीट भागात दर्शन घ्यायला चांगला सत्कार करू" अशी पोस्ट त्यांनी फेसबुक वर केली होती. त्यानंतर काल निवेदन देत असताना हा संपूर्ण प्रकार समोर आला यावेळी पूजा मोरे नक्की काय म्हणाल्या हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे..