दोन वेळेस कर्जमाफी होऊनही हिंगोलीतील शेतकरी लाभापासून वंचितच
दोन वेळेस कर्जमाफी होऊनही हिंगोलीतील शेतकरी लाभापासून वंचितच राहिल्याने शेतकऱ्यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हिंगोली : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांना मदत म्हणून तत्कालीन भाजपा सरकारने कर्जमाफी केली होती. त्यानंतर विद्यमान महाविकास आघाडीने देखील कर्जमाफी केली. अशाप्रकारे दोन वेळेस कर्जमाफीची घोषणा करून देखील प्रत्यक्षात मात्र या कर्जमाफीचा हिंगोलीतील शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही.त्यामुले हिंगोलीतील शेतकरी हतबल झाले आहेत
कर्जमाफीमध्ये पात्र असूनही अनेक शेतकरी यापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच ही कर्जाची रक्कम काही प्रमाणात सूट देऊन खातेदारांनी भरावी यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना बँक प्रशासनाकडून नोटिस पाठवण्यात आल्याने लोक अदालतीचे देखील आयोजन करण्यात आले होते.
अगोदरच शेतकरी अडचणीत असतांना कर्जाची ही रक्कम भरायची कशी असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर उभा राहीला आहे. त्यामुळे हिंगोलीतील शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करत सरकारने तातडीने पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.