पांडुरंगाच्या भक्तीपोटी केली केळीची आरास..
आषाढी एकादशीच्या पर्वावर विठ्ठल रखुमाई मंदिरात अडीच क्विंटल केळीची आरास
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील विठ्ठल रखुमाई मूर्तीस आषाढी एकादशीनिमित्त शांताराम पंढरीनाथ पाटील व राजेंद्र गजमल पाटील यांच्या शेतातील केळींची नयनरम्य आरास करण्यात आली. आज देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिर येथे मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी येत आहेत. संत मुक्ताई भजनी मंडळ यांनी मंगल काकड आरती व महापूजा केली. जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकले नाही ते त्या भक्तांनी आज सकाळी विठ्ठल रुक्माई मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. विठ्ठल रुक्माई मंदिरात पाटील यांच्या शेतातील लावलेल्या केळींच्या आरासने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.