शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये देण्याची मागणी
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये देण्याची मागणी...;
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणी अगोदर एकरी दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे. या मागणीला घेऊन युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शहरातील क्रांती चौक येथून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पायी चालत जागर रॅली काढण्यात आली. या सर्व युवा शेतकऱ्यांनी आयुक्त सुनील केंद्रेकर यांना फुलहार देऊन सत्कार केला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. युवा शेतकरी किशोर मराठे आणि गणेश उगले पाटील यांनी साधलेला संवाद....