चलो बनाए आशियां: आंदोलनातील शेतकऱ्यांनी रस्त्यावरच बांधली पक्की घर
दिल्लीतील आंदोलनातील शेतकऱ्यांनी रस्त्यावरच वीटेची आणि बाबूंची घरं बांधली आहेत. पाहा कशी आहेत ही घरं?;
दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाला येत्या 26 मार्चला चार महिने पूर्ण होत आहे. कधी थंडी, तर कधी पाऊस, कधी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खात शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत आहे. आता उन्हाळा लागला आहे. त्यात त्यांच्या डोक्यावर छत म्हणून वापरलेल्या ट्रॉली देखील तापत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपलं घर तयार करायला सुरूवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या ट्रॉली आता गव्हाच्या काढणीसाठी शेतीकामासाठी घरी पाठवल्या आहेत.
त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी पक्क्या विटांचे तसंच उन्हापासून वाचण्यासाठी बांबूची घरं तयार करण्यास सुरुवात केली आहे. सिंघू बॉर्डरवर (Singhu) शेतकऱ्यांनी बांबूपासून 25 फूट लांब आणि 12 फूट रुंद आणि 15 फूट ऊंचीचं बाबूचे घर बनवलं आहे. यामध्ये 15 ते 16 लोक आरामशीर राहू शकतात. दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे थंडी पडते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऊनही पडते.
या ऊन्हापासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी बांबूपासून घर तयार केलं आहे. विशेष म्हणजे उन्हामुळे आंदोलनाची धार कमी होऊ नये. म्हणून या घरात फॅन आणि कुलर लावण्यात आलं आहे.
सिंघू बॉर्डरवर बांबूचे घर तयार करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे टिकरी बॉर्डरवर डझनभर पक्के घर तयार करण्यात आले आहे. काही ठिकाणी घरासाठी वीट आणि सिमेंट तर काही ठिकाणी वीट आणि माती वापरुन घरं तयार केली जात आहे. ही घरं उभे करण्याचे कारण हे शेतकरी हवामानाचा काही भरोसा नाही. सध्या ऊन वाढत आहे. म्हणून आम्ही ही घर तयार करत असल्याचं सांगितलं.
टिकरी बॉर्डर अनेक ठिकाणी आता वीट मांडण्यात आल्या आहेत. दरवाजे लावले जात आहे. ही घरं तयार करताना शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येत नाही. कारण घरं उभारण्यासाठी स्वत: शेतकरी मजूर म्हणून काम करतो. तर गवंडी देखील यांच्यातीलच लोक आहेत. त्यामुळं ही घर कमी पैश्यात उभी राहत आहेत. या संदर्भात एनडीटीव्ही ने वृत्त दिलं आहे.