MSP हमी भावासाठी शेतकऱ्यांचा संसदेला घेराव...! शेतकऱ्यांचा 13 फेब्रुवारीला दिल्लीला मोर्चा: आंदोलन मार्गांवर अंथरले खिळे

Update: 2024-02-11 09:19 GMT

MSP हमी भावाला कायदेशीर हमी, स्वामिनाथन आयोग शिफारशिंची तात्काळ अंमलबजावणी, शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत या प्रमुख मागण्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी संघटनांचा मोर्चा 13 फेब्रुवारीला दिल्ली कडे कूच करणार आहे यामुळे सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे.

MSP साठी शेतकरी संघटना आणि सरकार मध्ये संघर्ष :


शेतकरी आंदोलनाची धग काय असते हे केंद्र सरकारला दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनामुळे चांगलं माहिती आहे. केंद्र सरकाने नवा शेती कायद्या केला त्यावेळी एक इंच ही मागे हटायला तयार नसलेल्या केंद्र सरकारला कायदा रद्द करावा लागला होता. MSP हमी भावाची गॅरंटी देऊन आंदोलन थांबवण्यात आलं होत.आता पुन्हा शेतकरी आंदोलन करणार असल्याने केंद्र सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. यामुळे सरकारही हे आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र शेतकरी हटायला तयार नाहीत. आंदोलन लॉन्ग चालू शकत या दृष्टीने शेतकरी आंदोलकानी गावोगावी जाऊन दवंडी देत आहेत, गेल्या काही महिन्यांपासून रेशन ही जमा करून ठेवलं आहे.

सुरक्षा यंत्रणा सतर्क :

शेतकऱ्यांच्या दिल्ली मोर्चाबाबत सुरक्षा दल व गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हरियाणात १५० नाके उभारले. सोनीपत, झज्जर, पंचकुला, अंबाला, कैथल, हिसार, सिरसा, फतेहाबाद, जिंदमध्ये कलम १४४ लागू केले. तर अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद, सिरसा येथे आज पासून सकाळी ६ ते १३ फेब्रुवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मोबाइल इंटरनेट, बल्क एसएमएस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबालातील पंजाब व हरियाणामधील शंभू सीमा सिमेंट बॅरिकेड्सने सील केली आहे. आंदोलन वाढू नये यासाठी सरकार शेतकरी आंदोलकांशी मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मुंडा आणि नित्यानंद १२ रोजी चंदीगडला जाऊन शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

आंदोलकांच्या मार्गांवर अंथरले खिळे :

ज्या मार्गाने शेतकरी आंदोलक दिल्ली ला येणार आहेत त्या मार्गांवर बॅरिकेड्समध्ये खिळे ठोकून रस्ता बंद केला आहे.गेल्या वेळीही सुरक्षा यंत्रणानी असाच प्रयोग केला होता मात्र तरीही आंदोलन बाराच काळ चाललं होत.

Tags:    

Similar News