शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होणार, काय आहे रणनीति?

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. यासाठी शेतकरी नेत्यांनी रणनीति तयार केली आहे. काय आहे ही रणनीति पाहा…;

Update: 2021-03-13 11:39 GMT

कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला 105 दिवस झाल्यानंतर शेतकरी नेत्यांनी हे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी नियोजन तयार केलं आहे. त्यानुसार 15 मार्च ते 28 मार्च पर्यंत सरकार वर दबाव टाकण्याची रणनीति तयार केली आहे..

26 मार्च ला भारत बंदचं आवाहन

संयुक्त किसान मोर्चा ने 26 मार्च ला शेतकरी आंदोलनाला 4 महीने पूर्ण होत असल्याने भारत बंदचं आवाहन केलं आहे. त्याच्या अगोदर 15 मार्चपासून शेतकरी आंदोलनाला सुरुवात करतील.

  • 15 मार्च ला शेतकरी कॉरपोरेट विरोधी दिवस आणि सरकार विरोधी दिवस म्हणून साजरा करतील. यामध्ये डिजेल, पेट्रोल, घरगुती गॅस आणि इतर आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतीवर जिल्हा अधिकारी आणि तहसिलदार यांना निवेदन दिलं जाणार आहे.
  • 15 मार्चलाच देशातील विविध स्टेशनवर विविध कर्मचारी संघटनांसोबत खासगीकरणाच्या विरोधात प्रदर्शन केलं जाणार.
  • 17 मार्च ला कर्मचारी संघटना आणि इतर संघटनांसोबत 26 मार्च च्या प्रस्तावित भारत बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी भेट घेतली जाणार.
  • 19 मार्च ला 'मुजारा लहर' दिन साजरा केला जाणार. FCI आणि शेती वाचवा कार्यक्रमाअंतर्गत देशभरातील विविध कृषी उत्पन्न बाजारसमितीत देशभरात प्रदर्शन केलं जाणार
  • 23 मार्च ला शहीद भगत सिंह यांच्या शहीद दिवसानिमित्त देशभरातील तरुण दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होतील.
  • 28 मार्च ला होळीच्या दिवशी होळीचं दहन करताना तीन कृषी कायदे जाळले जातील.

अशी रणनीति शेतकऱ्यांनी तयार केली आहे.

Tags:    

Similar News