मोदी सरकारने केलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांना गेले वर्षभर केलेल्या आंदोलनामुळे एक इतिहास निर्माण झाला आहे. सरकारला सपशेल माघार घ्यावी लागली. या आंदोलनात पंजाब, हरयाणा या राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात होतो, पण महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकरी नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते. हे आंदोलन आता स्थगित झाले आहे. पण या आंदोलनातून महाराष्ट्राला काय मिळाले, याचा आढावा थेट सिंघू बॉर्डरवर जाऊन घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे करस्पाँडन्ट शिवाजी काळे यांनी....