चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कापसाचे उत्पन्न घेतात. परंतु ज्या वेळेस कापसाला पाण्याची आवश्यकता होती त्यावेळेस पाऊस न झाल्याने आणि कापूस वेचणीच्या वेळेस सतत पाऊस पडल्याने कापसाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस सडू लागला आहे व कापसाची फुलं गळू लागली आहेत त्याचबरोबर कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पन्नावर त्याच्या परिणाम होऊन उत्पन्नात घट होणार आहे. कापसाला भाव नसल्याने लागलेला खर्च निघेल की नाही या चिंतेत कापूस उत्पादक शेतकरी सापडलेला आहे. शासनाने लाल्या शेतीचे पंचनामे करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी नितीन पाटील करत आहेत.