शेतकऱ्याने दुसऱ्याच्या पोटाकडे पाहण्यापेक्षा स्वतःच्या खिशाकडे पहा: दीपक परीख
जगभरामध्ये परिवर्तनाचे युग असून शेतकऱ्यांनी आतापर्यंत जमिनीवर प्रेम करून फक्त दुसऱ्याच्या पोटाचा विचार केला आहे यापुढील काळात जागतिक संधी लाभ घेत शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या पोटाचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा खिशाचा विचार करून धनवंत झाले पाहिजे. सरकारी धोरण शेतीपूरक करून बाजारावर नेहमीच शेतकऱ्यांचा वर्चस्व असला पाहिजे असे स्पष्ट मत वर्ल्ड इकॉनोमिक फोरमचे टेक्नॉलॉजी पायोनियर दीपक परीक OilGlobe2023 परिषदेत मॅक्स किसानशी बोलताना सांगितले.