विनापरवानगी शेतात खोदली पाईपलाईन: शेतकरी झाला संतप्त...
शेताच्या मधोमध परवानगी न घेता पाणीपुरवठा विभागांनी पाईपलाईन खोदल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालं आहे. तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्याने हताश होऊन जीवन संपवण्याचा इशारा दिला आहे..;
शेताच्या मधोमध परवानगी न घेता पाणीपुरवठा विभागांनी पाईपलाईन खोदल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालं आहे. तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्याने हताश होऊन जीवन संपवण्याचा इशारा दिला आहे..
देगलूर तालुक्यातल्या मौजे माळेगाव (मक्ता) येथील शेतकरी पांडुरंग लोकडोजी ढगे या 76 वर्षीय शेतकऱ्याच्या गट क्रमांक- 163 ,1.66 आर या जमिनीतून मध्यभागी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन खोदण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाणीपुरवठा विभाग व प्रशासनाने या शेतकऱ्याची कुठलीही संमती न घेता शेतकऱ्याच्या शेतात पाईपलाईनसाठी अनधिकृतपणे खोदकाम केले आहे. सदर पाईपलाईनचे काम थांबून खोदलेले काम बुजवण्यात यावे व पाणीपुरवठ्यासाठी करण्यात येत असलेली पाईपलाईन शेताच्या बांधावरून देण्यात यावे याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून या शेतकऱ्याने अखेर शंभर रुपयाच्या बॉण्डवर नोटरी करून राष्ट्रपती महोदयांना आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. जर माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी जीव देईल असा इशारा शेतकऱ्यांना दिला आहे..