शेतकरी पुत्रानं केलं कृषिमंत्र्यांचे एप्रिल फुल
जैविक पावडरच्या मदतीने पेरणी केल्यानंतर दीड ते दोन महिने पिकाला पाणी द्यायची गरज नाही असा दावा करणारा शेतकरी पुत्र प्रकाश पवार याला कुठलंही पेटंट केंद्र सरकारने दिलं नसल्याचे स्पष्ट झालं असून वायरल व्हिडिओच्या माध्यमातून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची देखील फसवणूक झाल्याचं उघड झाला आहे.;
जैविक पावडरच्या मदतीने पेरणी केल्यानंतर दीड ते दोन महिने पिकाला पाणी द्यायची गरज नाही असा दावा करणारा शेतकरी पुत्र प्रकाश पवार याला कुठलंही पेटंट केंद्र सरकारने दिलं नसल्याचे स्पष्ट झालं असून वायरल व्हिडिओच्या माध्यमातून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची देखील फसवणूक झाल्याचं उघड झाला आहे.
राज्यात यंदा कमी पावसामुळे अनेक ठिकाणी खरीप हंगाम वाया गेला आहे. मोठा पावसाचा खंड पडल्यामुळे दुबार तिबार पेरणीचे देखील संकट निर्माण झाले होते.गेले काही दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकाश पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
यामध्ये प्रामुख्याने मका पिकाच्या स्टार्चमधे अनेक दिवस पाणी आपल्यात साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या अन्य काही जैविक घटकांना एकत्र करून ही जैविक पावडर बनवण्यात आली असून दीड ते दोन महिने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या जैविक पावडर मध्ये आहे.त्यामुळे कमी पावसाच्या किंवा दुष्काळी भागात ही पावडर शेतीला वरदान देणारी ठरणार असल्याचा दावा सुनील पवार यांनी केला आहे.
या संशोधनासाठी प्रकाश पवार यांना पेटंट मिळालं असल्याचा दावा पवार यांनी केला आहे .याबाबत व्हिडिओमध्ये प्रकाश पवार म्हणतात, ' संशोधनात पीक लागवडीसाठी तसेच लागवडीपासून साधारणता २ महिने जरी पिकाला पाणी मिळाले नाही तरी पीक तग धरू शकते, असा अविष्कारी फार्मुला अंमलात आणला आहे.
निसर्गाच्या, वरुणराजाच्या लहरीपणावर सहज फायदा या संशोधनामुळे शेतकऱ्यांना होणार आहे. या संशोधनामुळे करोडो शेतकऱ्यांना मदत होणार आहे. आता पावसाची वाट न बघता लागवड करणे शक्य होईल.हे तंत्रज्ञान हे पूर्णपणे जैविक असून शेतकरीवर्गासाठी खूप स्वस्तही असणार आहे. हे संशोधनाच्या पूर्ण चाचण्या ४० ते ४५ डिग्री सेल्सिअसमध्ये घेतल्या असून सर्व यशस्वी झाल्या आहेत. या शोधामुळे वेळेवर पाऊस न आल्यामुळे होणारे नुकसान पूर्णपणे टाळता येईल आणि शेतकरी आत्महत्या थांबवता येतील. आता अल्पप्रमाणात पाण्याचा वापर करून देखील शेती करणे शक्य होईल, असे संशोधक प्रकाश पवार यांचे मत आहे. २० वर्षांसाठी त्यांना बौध्दिक संपदा अधिकारही प्राप्त झाले आहेत असाही पवार यांचा दावा आहे.
मका अनेक दिवस पाणी आपल्यात साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या अन्य काही जैविक घटकांना एकत्र करून ही जैविक पावडर बनवण्यात आली असून दीड ते दोन महिने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या जैविक पावडर मध्ये आहे. त्यामुळे कमी पावसाच्या किंवा दुष्काळी भागात ही पावडर शेतीला वरदान देणारी ठरणार असल्याचा दावा सुनील पवार यांनी केला आहे.
विशेष म्हणजे सोशल मिडीयावर पवार यांचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर सुनील पवार यांच्या या संशोधनाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेत सुनील पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली.
कृषी विद्यापीठातील तज्ञांची एक टीम पुढील आठवड्यात सुनील पवार यांनी संशोधन केलेल्या या पावडरचा व त्यांनी वापर केलेल्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जाणार आहे या टीमचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही कृषीमंत्री मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले.
पेरणी पासून ते पिकांना पाणी देण्याच्या काळात देखील सुनील पवार यांनी संशोधन केलेली जैविक पावडर दीड ते दोन महिने पाणी नसले तरी पिकांना जगवु शकते; हा प्रयोग पूर्णपणे जर यशस्वी झाला तर शेती क्षेत्रात क्रांती घडवणारा हा निर्णय ठरेल, तसेच दुष्काळी व अवर्षण ग्रस्त भागात देखील ही पावडर एक प्रकारचे वरदान ठरणार आहे. म्हणूनच चाळीसगाव जि.धुळे येथे आम्ही लवकरच कृषी विद्यापीठाच्या तज्ञांची एक टीम सुनील पवार यांच्या भेटीला पाठवत आहोत. या टीमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
दुष्काळी महाराष्ट्रामध्ये यापूर्वी अवर्षण ग्रस्त भागामध्ये दुबार तिबार पेरणीचा प्रश्न सोडवण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले आहेत.कृषी शास्त्रज्ञ डॉ. विवेक शिंदे या संदर्भात मॅक्स किसानशी बोलताना म्हणाले, कोणत्याही पिकाची पेरणी होण्याआधी जमिनीची मशागत करून एक तृतीयांश ओलावा असताना पेरणी करण्यात येते.
कापसासारखे पिकामध्ये धूळपेरणी होते. त्या ठिकाणी पाऊस उशिरा आला तरी कापसाच्या बियाण्याची कठीण कवच आणि कीटकनाशकाचे कोटिंग असल्यामुळे काही काळ बी तग धरू शकतं. परंतु बियाचं पिकामध्ये रूपांतर होण्यासाठी ओलाव्याबरोबरच बिया मधील गर्भ ( embryo) फलित होऊन त्याचे झाड तयार होते. अवरक्षणाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी यापूर्वी अनेक संशोधित वाण आणि तंत्रज्ञान देखील विकसित करण्याचे प्रयत्न झाले आहेत. हायड्रोजन जेलीचे प्रयोग यापूर्वीही झाले असून मोठ्या प्रमाणात पेरणी क्षेत्र असल्यामुळे हायड्रोजन जेल ची किंमत आणि फायदे तसंच या प्रयोगाची यशस्विता याबद्दल अजूनही शास्त्रज्ञांचे समाधान झालेले नाही.
प्रकाश पवार यांना खरचं पेटंट मिळाले आहे का याची देखील तपासणी MaxKisan ने केली. त्यानुसार केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आखरीत असलेल्या Office of the controller General of Patents, Designs & Trade Mark यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावरून माहिती घेतली असता प्रकाश सुनील पवार यांच्या नावे 202321052775 क्रमांकाने सात ऑगस्ट 2023 रोजी पेटंट साठी अर्ज दाखल केला आहे.
बौद्धिक संपदा कायद्यातील तरतुदीनुसार कोणतेही पेटंट मंजूर करण्याची प्रक्रिया तीन ते चार वर्षाची असते. प्रकाश पवार यांनी सात ऑगस्ट 2023 रोजी अर्ज दाखल केला आहे.
कायद्यातील 11A कलम तरतुदीनुसार हे संशोधनाचा अर्ज कार्यालयाच्या संकेतस्थळावर 15 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झाला आहे.
पेटंट प्राप्त होण्याची प्रक्रिया दीर्घ असून सर्व प्रकारच्या तपासण्या आणि परीक्षा त्यापूर्वी पार पाडाव्या लागतात. त्यामध्ये स्वतंत्ररित्या अर्ज केलेले शंभर पैकी 90 संशोधन हे पेटंट साठी रिजेक्ट होण्याचे प्रमाण आहे, असे DUXLEGIS या बौद्धिक संपदा क्षेत्रातील सल्लागार कंपनीचे संस्थापक दिवेंदु वर्मा यांनी मॅक्स किसानशी बोलताना सांगितले.
भाभा अणुसंशोधन केंद्राने यासंबधात पॉलिमर हायड्रोजेल तंत्रज्ञान विकसीत केले असून ते व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध आहे, असे दुबईस्थित तंत्रज्ञ ज्ञानेश्वर अवसरे यांनी सांगितले.
याबाबत शेतकरी पुत्र प्रकाश पवार यांच्याकडून तू स्थिती जाणून घेण्याचा MaxKisan ने वारंवार प्रयत्न केला. परंतु त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून माहिती घेतली असता कृषी मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी म्हणाले, सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यामुळे कृषी मंत्री कार्यालयाला दखल घ्यावी लागली. कृषी मंत्री धनंजय मुंडे स्वतः प्रकाश पवार यांच्याशी बोलले. त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे मोबाईल संभाषण प्रकाश पवार यांनी रेकॉर्ड करून व्हायरल केले.
त्यामुळे कृषिमंत्री कार्यालयाने प्रेस नोट काढून भूमिका विशद केली. अर्थात कृषी विद्यापीठाचे पथक प्रत्यक्ष भेट देऊन संशोधनाची वस्तुस्थिती तपासून पाहणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.