शेतकरी आंदोलनात अमित शहांची एंट्री: तोडगा निघणार ?

गेली तेरा दिवस सुरु असलेले दिल्लीतील शेतकरी आंदोलन आज झालेल्या भारत बंद आंदोलनानंतर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्याच्या बैठकीपूर्वी अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.;

Update: 2020-12-08 11:53 GMT

तेरा दिवसापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी समर्थनार्थ आज देशात भारत-बंद आंदोलन करण्यात आले. देशाच्या विविध राज्यात आणि ठिकठिकाणी भारत बंदचे पडसाद उमटले. सलग तेरा दिवस आंदोलन करुनही १३ दिवसात निर्णयाविहरीत बैठका आणि सरकारकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांनी आज भारत बंदचा नारा दिला होता. यापुर्वी पाच बैठका निर्णयाविना पार पडल्यनंतर आजच्या भारत बंदनंतर उद्या सरकारसोबत चर्चेची सहावी फेरी पार पडणार आहे. त्यापूर्वीच अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीतून तोडगा निघेल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शाह यांनी शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली असून, सायंकाळी सात वाजता ही बैठक सुरू होणार आहे. अचानक ही बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत तिन्ही कृषी विधेयकासंदर्भात महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी या बैठकीविषयी माहिती दिली आहे. सकाळी अमित शाह यांच्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. ही बैठक अनौपचारिक असणार आहे. या बैठकीत १३ शेतकरी सदस्य गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

मोदी सरकारनं नव्याने केलेले कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०, शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक २०२० हे रद्द करावेत. कृषी मालाला हमीभाव देण्याची हमी द्यावी. त्याचबरोबर प्रस्तावित वीज कायदाही मागे रद्द करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांची मागणी आहे. हे कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Tags:    

Similar News