विहिरीची नोंद करण्यासाठी शेतकऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील अल्पभूधारक शेतकरी शेख, करीम शेख रशीद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विहिरीची नोंद करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. शेतकरी शेख करीम यांनी साखरखेर्डा येथे 2016 मध्ये शेत खरेदी करून 2017-18 मध्ये कर्ज काढून विहीर खोदली होती. तेव्हापासून विहिरीची नोंद करण्यासाठी तहसीलदार, तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे वारंवार विनंती करून देखील नोंद करण्यात आली नसल्याने त्यांनी 21 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही तसेच जीवाला काही झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही यावेळी उपोषणकर्ते शेतकरी शेख करीम, शेख रशीद, यांनी सांगितले.