रेशीम शेतीतून शाश्वत शेतीकडे वाटचाल
आधुनिक शेतकऱ्यांची रेशीम उदयोगाकडे यशस्वी वाटचाल
शेतकरी हे आधुनिक शेती कडे जाताना आपल्याला दिसून येत आहेत सतत पडणारा दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीस आलेल्या आपल्याला पहायला मिळत आहे.. कुठेतरी जोड व्यवसाय करावा या हेतूने शेतकरी हा रेशीम शेती व्यवसायाकडे जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळतायत. रेशीम शेती हा व्यवसाय,अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातूनही करता येत असल्याचे शेतकरी संतोष वराडे यांचा अनुभव नक्की पहा MaxKisan च्या अजय गाढे यांच्या रिपोर्टच्या व्हिडिओच्या माध्यमातून..
हा रेशीम उदयोग कसा उभारावा तसेच तुती लागवड पध्दत व रेशीम कीटक संगोपन पध्दत कशी आहे याविषयी शेतकरी संतोष वराडे यांनी सविस्तर मार्गदर्शन....
मुळात चिंचोली येथील राहणारे संतोष वराडे यांनी शेतातील उत्पन्न कमी होत असल्याचे पाहून एक जोडव्यवसाय म्हणून रेशीम शेती करण्याचे ठरवले परंतु कमी भांडवलात कोणताही उदयोग नसल्याचे पाहत त्यांनी 2008 साली गावात प्रथम रेशीम उदयोग उभा केला...अत्यंत कमी मजूरात व जास्त भांडवल न गुंतवता मोठया प्रमाणात रेशीम उदयोगातून उत्पन्न घेत शेतातील असणाऱ्या वेस्टेज मटेरियल पासून सुरवातीला संतोष वराडे यांनी यासाठी लागणारे शेड तयार करून हा व्यवसाय कमी खर्चात सुरु केलाय ..... यासाठी त्यांना सुरुवातीला तुती लागवड करून रेशीमच्या एका बॅच पासून एक ते दीड लाख तर साधारणता वार्षिक तीन ते चार लाखापर्यत उत्पन्न या रेशीम उदयोगतून मिळवलय ..सुरवातीला रेशीम पासून मिळणारा कोस हा कर्नाटक येथे पाठवून त्यांनी भरघोस उत्पन्न देखील मिळवलंय.
रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी जैविक खताचा वापर करून संतोष वराडे यांनी एक आगळावेगळा संदेश देखील दिलाय..... तर दुष्काळ परिस्थिती व पाण्याची कमतरता पाहता या कमी खर्चात जास्त उत्पन्न म्हणून रेशीम उदयोगाकडे शेतकऱ्यांनी भर देण्याची गरज संतोष वराडे दिलीय....