शेतकरी नेते राजू शेट्टी मोर्चासह उद्या आझाद मैदानावर धडकणार

ऊस (sugar cane) तोडणी सातशे रुपये करण्यात यावी, ऊस तोडणी मशीन मालकांसाठी लवाद स्थापन करण्यात यावा तसेच प्रलंबित अनुदान देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेतर्फे उद्या आझाद मैदानावर विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

Update: 2023-04-04 11:30 GMT

ऊस (sugar cane) तोडणी सातशे रुपये करण्यात यावी, ऊस तोडणी मशीन मालकांसाठी लवाद स्थापन करण्यात यावा तसेच प्रलंबित अनुदान देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेतर्फे उद्या आझाद मैदानावर विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.ॉ




 

हजारोंच्या संख्येने येणाऱ्या मोर्चेकरांना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju shetty) मार्गदर्शन करणार आहेत.ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या मागण्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांचाही पाठिंबा आहे.

अशी माहिती संघटनेचे सचिव अमोल राजे जाधव यांनी दिली. या मोर्चात मोठ्या संख्येने ऊस तोडणी मशीन मालक सहभाग घेणार आहे. या मोर्चा संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, सहकार आयुक्त शेखर गायकवाड आणि सहकार मंत्री अतुल सावे यांना निवेदन देण्यात आले आहे.


Tags:    

Similar News