फुलशेतीतून शेतकऱ्याला लॉटरी...
शेतकऱ्याने चार एकर शेती मध्ये वेगवेगळी पिके व भाजीपाला तसेच फुल शेती करून वर्षाकाठी सात ते आठ लाखांचे उत्पन्न काढत आहे;
नायगाव तालुक्यातील गोळेगाव येथील एका शेतकऱ्याने चार एकर शेती मध्ये वेगवेगळी पिके व भाजीपाला तसेच फुल शेती करून वर्षाकाठी सात ते आठ लाखांचे उत्पन्न काढत आहे. या शेतामध्ये चार ते पाच लोक एकत्र काम करत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुट पालन व्यवसाय चालू केला आहे. यामधून देखील त्यांना चांगला नफा मिळत आहे. पपई फळाची लागवड केली आहे. तसेच अन्य भाजीपाल्याची लागवड करुन योग्य पद्धतीने शेती केली जात आहे, अशी माहिती शेतकरी किरण वाघमारे यांनी दिली आहे.