जळगावातील पाचोरा तालुक्यातील सारोळा येथील प्रगतशील शेतकरी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपल्या अडीच एकर शेत जमीन मध्ये सुमारे 2200 पपईची रोपांची (papaya)लागवड केली आहे. त्यात त्यांनी दुहेरी पीक पद्धतीचा अवलंब केला आहे. पपईच्या शेतामध्ये त्यांनी दुहेरी पीक म्हणून भेंडस ची लागवड करून दुहेरी उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला आहे. त्यांनी अडीच एकर पंपई मध्ये भेंडस ची लागवड केली आहे. त्यात त्यांना सुमारे सव्वा लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकाची निवड करून भरघोस उत्पन्न घेण्याची गरज आहे. पारंपारिक पीक पद्धतीत शेती न करता बाजार भावाच्या नुसार शेती पिकाचे नियोजन केले तर नक्कीच शेतकरी राजा कर्जबाजारीतुन मुक्त होवु शकतो असे त्यांनी सांगितले आहे.