शेतकर्‍याने चार एकर सोयाबीन पिकावर फिरवला नांगर

खंदरमाळ येथील सुरेश गोपीनाथ भागवत या तरूण शेतकर्‍यावर चार एकर केलेल्या सोयाबीन पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.त्यामुळे सोयाबीनसाठी झालेला सर्व खर्च अंगलट आला आहे..;

Update: 2023-09-17 12:30 GMT

खंदरमाळ येथील सुरेश गोपीनाथ भागवत या तरूण शेतकर्‍यावर चार एकर केलेल्या सोयाबीन पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.त्यामुळे सोयाबीनसाठी झालेला सर्व खर्च अंगलट आला आहे.

Full View

खंदरमाळ येथे सुरेश भागवत हे तरूण शेतकरी राहात आहे.जुलै महिन्यात त्यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात सोयाबीन पेरले होते यासाठी त्यांचा मोठा खर्च झाला होता.सुरूवातीला थोड्याफार प्रमाणावर झालेल्या पावसाने सोयाबीनचे पिक चांगले उतरून आले होते.मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाची वाढ ही झाली नाही.चांगला पाऊस होईल या आशेवर भागवत या तरूण शेतकर्‍याने सोयाबीन केले होते.पण काहीच उपयोग न झाल्याने शेवटी संतापून भागवत यांच्यावर चार एकर सोयाबीन पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.त्यामुळे सोयाबीन पिकासाठी झालेला सर्व खर्च अंगलट आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


Tags:    

Similar News