शेतकऱ्यांवरचे संकट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने अक्षरशः सोयाबीन पीक सुकून जात आहे, आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील श्रीकृष्ण कवळकार या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातील उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवून या पिकात जनावरे घातली आहेत. हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेकदा फवारण्या करूनही पिक आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी छातीवर दगड ठेवून हे पीक उपटून फेकल्याचे शेतकरी श्रीकृष्ण कवळकार यांनी सांगितले.