चारीला पाणी सोडा; शेतकऱ्यांची आग्रही मागणी
भोजापूर चारीला पाणी सोडा संगमनेर मध्ये शेतकऱ्यांची आग्रही मागणी;
संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना आता तरी भोजापूर चारीद्वारे पाणी सोडा अशी आग्रही मागणी संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागातील गावे नान्नज दुमाला बिरेवाडी,काकडवाडी, सोनोशी पारेगाव खुर्द, तिगाव इत्यादी गावांच्या शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे. ह्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ६ वाजता भोजापुर कोरड्या चारीची पाहणी केली. जोपर्यंत भोजपुरी चारीद्वारे पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही येणाऱ्या काही दिवसात आमरण उपोषणाचे हत्यार उपसनार असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.यावेळी भोजपुर पाण्यापासून वंचित असलेल्या सर्वच गावातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना शेतकरी पांडूरंग फड ,किसन चत्तर,दत्तू फड भोजापूरचे पाणी मिळण्याची मागणी केली आहे.